Sunday, 31 March 2013

व्यर्थ न हो बलिदान !

“मुंबै” कुणाची, मराठी माणसांची? छे छे! विसरा ती स्वप्ने कायमची !
१९६० साली महाराष्ट्रराज्यनिर्मिती झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाचे प्रमान ५४ टक्के होते. आज २५ वर्षांनंतर ते २५ टक्क्यांहून कमी आहे. मोडकळीला आलेली मराठी माणसांची घरे, जागांच्या किंमतीत झालेली बेसुमार वाढ, प्रचंड लोकवस्ती आणि प्रतिदिनी “मुंबै” वर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे, याची परिणती अटळ आहे. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मऱ्हाठी माणसाच्या वाट्याला या पुढच्या काळात येणार नाही. उद्ध्वस्त संसार पाठीवर घेऊन स्वतःच्याच राज-धानीतून परागंदा होण्याचा प्रसंग त्यांच्यावर गुदरणार आहे. 

Read More

wyarth-he-balidan

 

No comments:

Post a Comment