स्वातंत्र्यपूर्वकालपासूनया देशातील शिक्षणपद्धती
बदलली पाहिजे , असा आक्रोश सर्वत्र चालू आहे. मातृभाषा हेच शिक्षणाचे
माध्यम राहील ही मागणी राज्यकर्त्यांनी मान्य केली होती. परंतु उच्च
शिक्षणाचे इंग्रजीचे स्तोम कायम ठेवून शालान्त शिक्षणापर्यंत मातृभाषेचा
स्वीकर करून बहुजन समाजाच्या तोंडाला पाने मात्र पुसण्यात आली. लोकांची
मागणी मान्य केल्याचे चित्र मात्र उभे करण्यात आले. मातृभाषा, राजभाषा
ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंडा होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य,
कला, संस्कृती यांच्याबद्दल रास्त अभिमान नाही, त्यांना आपल्या
राष्ट्राबद्दल अभिमान कसा वाटावा?
Read More:
No comments:
Post a Comment