आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे
निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी
झाली होती नुसती.म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या
चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ
रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या
पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या
गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत
पोहोचला. बाय एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्.टी.निघून गेली होती.
बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?’
Read More:
No comments:
Post a Comment