Links

Sunday 14 July 2013

गर्दीत वाट हुडकतोय....

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.
उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो. शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो. माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झले, पॅकेज वाढले.

मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो आता "पी. एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे. एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही. मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.

घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “जाउ दे त्याला निवांत” महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....

मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही, मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.

लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.

गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही.


Sunday 31 March 2013

पु.लं. आंनदाचा निर्मळ झरा


प्रिय बालमित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईबद्दल मी नवं काय लिहु?

भाई हे आपलं `लाडक दैवत’होतं. कुणीही विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्यानं मला विचारलं,

`सर, मला वाचनाची आवड निर्माण करायचीय कुठून सुरुवत करु?’

मी त्याना म्हणतो. `अपूर्वाही वाच-’ बस्स. पु,लं.चे शब्द म्हणजे निर्मल निळाईचा गोड झरा.

आपले मन त्या झऱ्यात केव्हा भिजून रमून जाईल ते कळत नसे.

लाखो मराठी मनाशी मैत्री साधण्यातच कसब पुलंना साधलं कसं? केवल `प्रतिमा’ हे त्याचं उत्तर नाही.

प्रतिभा अनेकांना असते. पण पु.लं. आवडलं याच महत्वाच कारण त्यांचा मथाळ स्वभाव.

Read More:

Aanandacha Nirmal Zra

Aanandacha Nirmal Zra

गोष्ट तीन आण्यांची

आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?’

Read More:

gost-teen-anyanchi

 

व्यर्थ न हो बलिदान !

“मुंबै” कुणाची, मराठी माणसांची? छे छे! विसरा ती स्वप्ने कायमची !
१९६० साली महाराष्ट्रराज्यनिर्मिती झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाचे प्रमान ५४ टक्के होते. आज २५ वर्षांनंतर ते २५ टक्क्यांहून कमी आहे. मोडकळीला आलेली मराठी माणसांची घरे, जागांच्या किंमतीत झालेली बेसुमार वाढ, प्रचंड लोकवस्ती आणि प्रतिदिनी “मुंबै” वर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे, याची परिणती अटळ आहे. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मऱ्हाठी माणसाच्या वाट्याला या पुढच्या काळात येणार नाही. उद्ध्वस्त संसार पाठीवर घेऊन स्वतःच्याच राज-धानीतून परागंदा होण्याचा प्रसंग त्यांच्यावर गुदरणार आहे. 

Read More

wyarth-he-balidan

 

मराठी भाषा आणि नवीन सरंजामदार

स्वातंत्र्यपूर्वकालपासूनया देशातील शिक्षणपद्धती बदलली पाहिजे , असा आक्रोश सर्वत्र चालू आहे. मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम राहील ही मागणी राज्यकर्त्यांनी मान्य केली होती. परंतु उच्च शिक्षणाचे इंग्रजीचे स्तोम कायम ठेवून शालान्त शिक्षणापर्यंत मातृभाषेचा स्वीकर करून बहुजन समाजाच्या तोंडाला पाने मात्र पुसण्यात आली. लोकांची मागणी मान्य केल्याचे चित्र मात्र उभे करण्यात आले. मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंडा होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्याबद्दल रास्त अभिमान नाही, त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान कसा वाटावा? 
Read More:

Marathi-bhasha aani navin sanskar

 

भारतातील `इंडिया’

“अंकल, असल्या घाणेरड्या, काळ्या , डर्टी प्राण्याचे दूध तुम्ही चहासाठी वापरता? म्हणजे मी जो आतापर्यंत चहा पीत होते त्या चहात या प्राण्याचे दूध घालीत होता?” असे तिने एका मागोमाग अनेक प्रश्न विचारले. आपण असला चहा यापुढे पिणार नाही. तिने असा निश्चय का करू नये? अमेरिकेत तिने दूध देणारी म्हैस पाहिलीच नव्हती; तिचा काय दोष? तिचे जग वेगळे होत. पाश्चात्य संस्कृतीतले, साठ सत्तर वर्षे आमच्यापुढे असलेले....
Read More : 

Bhartatil-india

 

मराठी भाष्या उपेक्ष्या

मराठी विद्वान प्राध्यापकांना मराठी भाषा, साहित्य, कला, आणि संस्कृती याबद्दल भलताच. भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा विकास लोकसंस्कृतीतून होत असतो. तेव्हा शिक्षण लोकसंस्कृतीला सामोरे जाणारे हवे. आता सांगा, महाराष्ट्रसरकारच्या दरबारी महाराष्ट्रसंस्कृतीसंवर्धन नाही का? एवढे मोठे विद्वान ठिकठिकाणी राहतात, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय सरकारने हे ठरविले असेल काय? आमच्या प्राध्यापकांना काही कळतच नाही. ज्युनियर कॉलेजचा अभ्यासक्रम आखून दोन वर्षे झाली, तेवढ्यात तो जुनाही झाला.... Read More.

Marathi-bhashyechi upeksha

Saturday 30 March 2013

Tejaswini Pandit










Sonali khare

Sonali khare Marathi Movie actress.





Sonalee Kulkarni

Top Marathi actress Sonalee Kulkarni, her superhit movie was Natrang.

Download wallpapers.






Smita Shewale







Siyaa Patil

Siyaa Patil Marathi cinema actress.







Shruti Marathe

Shruti Marathe Marathi Movie actress.








Sharvari Jamenis

Sharvari Jamenis Marathi actress, download latest Picture gallery of Sharvari Jamenis.









Rupali Bhosle

Rupali Bhosle Marathi Movie actress.

Picture Gallery.





Priya Bapat

Priya Bapat Marathi actress, Detailed information about Priya Bapat available on Marathi unlimited.